आज बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला सुरूवात झाली. बंगालमध्ये यापूर्वीच्या टप्प्यांतील मतदानाच्या दिवशी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तोच कित्ता पुढे गिरवत आजही बंगालमध्ये तुरळक ठिकाणी हिंसाचार घडून आला.
शांतीनगरच्या सॉल्ट लेक परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी मतदानाला आलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या समर्थकांना मतदान करण्यास मज्जाव केला असा आरोप या महिलेने केला आहे.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीसांची मेयो आणि मेडीकल रुग्णालयाला भेट
मलिकांची ट्विट्स म्हणजे अर्धसत्य आणि असत्य
महाराष्ट्रात चौथा खांब सुरक्षित नाही
नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलतात का?
या महिलेने केलेल्या आरोपांनुसार, मतदानाच्या आदल्या दिवसापासून तृणमुल काँग्रेसचे गुंड सर्वांना सांगत फिरत होते, की आम्ही जर मतदानाला बाहेर पडलो, तर आम्हाला २ मे नंतर त्याचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतील.
यामुळे लवकरच शांतीनगर मध्ये मोठा हिंसाचार उफाळून आला. तृणमुलच्या गुंडांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक भाजपाच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आली. सॉल्ट लेकचे भाजपाचे उमेदवार सब्यासाची दत्ता यांनी पोलिस यावेळी कुठलीही कारवाई न करता, तृणमुलच्या कार्यकर्त्यांना हिंसाचारासाठी मोकळं रान देत असल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे तृणमुलचे उमेदवार सुजित बोस यांनी देखील भाजपाच्या सब्यासाची दत्त यांच्यावर हिंसाचाराचा आरोप केला.
या प्रसंगानंतर शांतीनगर मधील स्थानिकांमध्ये घबराट पसरल्याने लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
बंगालच्या आठपैकी पाचव्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. बंगालसोबत इतर पाच राज्यांतही निवडणुका पार पडल्या आहेत. त्या राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान झाले. आज बंगालसोबत महाराष्ट्रात पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील पोट निवडणुकांचे मतदानदेखील होत आहे.