पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसाच्या बांगलादेशच्या दौऱ्यानंतर त्या देशात हिंसा भडकली आहे. हजारो इस्लामी कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याचं वृत्त आहे. पूर्व बांगलादेशातल्या रेल्वे गाडीवर आणि मंदिरावर हा हल्ला करण्यात आला असून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने इस्लामी कट्टरतावाद्यांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
स्थानिक पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे, गेले दोन दिवस सुरु असलेल्या या हिंसाचारात किमान ११ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध म्हणून काही इस्लामी कट्टरतावाद्यांनी ही हिंसा घडवून आणली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बांगलादेशच्या दौऱ्यावर पोहोचले. बांगलादेश या वर्षी त्या देशाच्या ५० वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली होती.
हे ही वाचा:
कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ
ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह
मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे
कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक
बांगलादेशातील इस्लामिक कट्टरवादी गटाचं म्हणणं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मुस्लिम लोकांशी भेदभाव करतात. त्यावरुन त्यांनी मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध केला होता. सुरक्षा रक्षकांनी या कट्टरतावाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व बांगलादेशातील रेल्वे गाड्यांसोबत हिंदू मंदिरावर या कट्टरवाद्यांनी हल्ला केला. तसेच या परिसरातील सरकारी कार्यालयातील कागदपत्रेही पेटवण्यात आली. ढाक्यातील अनेक रस्ते या कट्टरवाद्यांनी बंद केले आहेत.
बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत. सोऱ्हावर्दीच्या काळातील हिंदूंचे हत्याकांड असो. फाळणीच्यावेळी झालेले शिरकाण असो किंवा १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सेनेकडून झालेले बलात्कार आणि हत्याकांड असो, या सर्व वेळी बळी गेला तो हिंदूंचाच. त्याच इतिहासाचा हा एक नवीन भाग आहे.