भाजपाच्या राष्ट्रीय महामंत्री पदी विनोद तावडे

भाजपाच्या राष्ट्रीय महामंत्री पदी विनोद तावडे

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी ही नियुक्ती केली आहे. या आधी तावडे यांच्यावर राष्ट्रीय मंत्री म्हणून दायित्व होते. तर तावडे यांच्या सोबतच इतरही काही महत्वाच्या नियुक्त्या नड्डा यांनी केल्या आहेत.

रविवार, २१ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महत्वाच्या काही नियुक्त्या केल्या आहेत. या मध्ये महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना मंत्री पदावरून बढती देत महामंत्री करण्यात आले आहे. तर बिहार मधील ऋतुराज सिन्हा आणि झारखंड मधील आशा लाकडा यांना राष्ट्रीय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?

हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट

दक्षिणेत पुराचे थैमान सुरूच

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये आणखीन दोन नावे वाढवली आहेत. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून भारती घोष आणि शेहजाद पूनावाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पैकी शेहजाद पूनावाला हे आधी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. पण राहुल गांधी यांच्या विरोधात बंड पुकारल्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांना आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते बनवण्यात आले आहे.

Exit mobile version