विक्रम मिसरी यांनीच डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम मिसरी हे आता एनएसए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सहाय्यक म्हणून काम करणार आहेत. विक्रम मिसरी यांची डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून करण्यात आलेली नियुक्ती ही राह्स्त्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जात आहे. मिसरी हे काश्मीर आणि चीन प्रश्नाचा गाढा अभ्यास असलेले अधिकारी मानले जातात.
मिसरी हे ११ डिसेंबर पर्यंत चीन येथे राजदूत म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी प्रदीप कुमार रावत हे तो पदभार स्वीकारणार आहेत. तर मिसरी हे डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कार्यरत होणार आहेत.
हे ही वाचा:
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता
‘आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधित्व करत नाही!
लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक
दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर
कोण आहेत विक्रम मिसरी?
मिसरी हे १९८९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांचा जन्म श्रीनगर येथे झाला असून त्यांचे शिक्षण दिल्ली येथून पूर्ण झाले आहे. त्यांनी एमबीए ही पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी जवळपास तीन वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केले. १९८९ साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन परराष्ट्र सेवेत दाखल झाले.
त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात तसेच पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. त्यांना इंदर कुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी अशा तीन पंतप्रधानांचे सचिव म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी गेल्या काही काळापासून चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला. गलवान प्रश्न ऐरणीवर असताना ते बीजिंग मधले भारताचे दूत होते. या काळात त्यांनी भारतीय आणि चीन यांच्या द्विपक्षीय चर्चांमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.