अभिनेते विक्रम गोखलेंचे बिनधास्त बोल; देश हिरवा नको, भगवाच राहिला पाहिजे!

आपला देश भगवाच राहिला पाहिजे. तो कधीही हिरवा होता कामा नये. हिंदू संस्कृती ही सर्वाना एकत्र घेऊन जाण्याची परंपरा आहे, असे रोखठोक मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यानी व्यक्त केले. कर्वेनगर येथील एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी उपरोक्त विधान केल्यानंतर त्यावर राज्यभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गोखले म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबर ला येते ती हेतूपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे हे कारस्थान सुरू आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही. हा देश भगवा राहिला पाहिजे. असेही वक्तव्य गोखले यांनी केले.

महागाईच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, महागाई काय मोदींनी वाढविली का? अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी १० हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहित आहे का, एक माणूस ७० वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का, अशा वेळी त्याच्या पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले एअर इंडियाला व एसटीला गाळात घाल्याण्याचे काम राजकीय लोकांनी केले आहे. कंगना राणावत जे बोलली त्या विधानाशी मी सहमत आहे. प्रत्येक कामाच्या खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे. फडतूस कारणामुळे राजकारण होत आहे.

 

हे ही वाचा:

त्रिपुरात आग लागलीच नाही, पण महाराष्ट्रात धुर उडाला

‘हे’ आहे त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील आंदोलनांचे कनेक्शन

किवी विरुद्ध कांगारू सामन्यात कोणाची होणार सरशी?

‘हे मायावी बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर’

 

अभिनेत्री कंगना रनौटने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केले. १९४७ मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होती या कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे.

Exit mobile version