रविवारी हिंदू नवर्षाचा शुभारंभ झाला आणि राज्यभरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. गुढीपाडव्यानिमित्त बोलताना विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. गुढीपाडव्याला गुढी उभारायच्या भानगडीत पडत नसल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणले की, “मी काही गुढी- बिढी उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्याचा हा दुसरा दिवस आहे, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी. आम्ही या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं त्याला पडू दे. मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही,” असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. यामुळे आता नवा वाद पेटू शकतो.
हे ही वाचा..
बीड मशिद स्फोट प्रकरणात एटीएसकडून चौकशी
गुजरातमधील बंदूक परवाना घोटाळ्यात २१ अटकेत
GROK 3 सह स्टुडियो घिबली शैलीतील ईमेज कशी तयार करावी: सविस्तर वाचा
गुढीपाडव्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या वडेट्टीवार यांनी दुसरीकडे मात्र गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शुभेच्छा देताना लिहिले आहे की, “गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.” एकीकडे शुभेच्छा आणि दुसरीकडे वादग्रस्त विधान करणाऱ्या वडेट्टीवार यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल आता सर्वत्र चर्चा केली जात आहे.
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची!नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. pic.twitter.com/IcvFVSQhb3
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 30, 2025