27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणआमच्याच जीवावर राज्यसभेत पोहोचलात, हिंमत असेल तर राजीनामा द्या!

आमच्याच जीवावर राज्यसभेत पोहोचलात, हिंमत असेल तर राजीनामा द्या!

विजय शिवतारे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Google News Follow

Related

शिवसेनेच्या नाशिक बालेकिल्ल्याला भगदाड पाडत शुक्रवारी ३० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रया देताना खासदार संजय राऊत यांनी ‘सर्व चोर, लफंगे शिंदे गटात गेले आहेत. हा कचरा होता. पानगळ होती. ती शिंदे गटात गेलीय’ अशी टीका केली होती. या टीकेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आम्हाला कचरा म्हणता? हिंमत असेल तर १२ तासांच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या. उगाच बाष्कळ बडबड करू नका. राजीनामा द्या. मग तुम्हाला तुमची लायकी कळेल अशी कडक टीका शिवतारे यांनी केली आहे.

आम्हाला कचरा म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा जन्म सुद्धा इथेच झालेला आहे. ज्यांना तुम्ही कचरा म्हणत आहात, त्याच आमदार आणि खासदारांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेत पोहोचलेले आहात. आता हे सर्व जण तुम्हाला तेवढाच कचरा वाटत असतील तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं संजय राऊत करत आहेत. जरा निवडणुकीला उभे राहून दाखवा म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळेल असा घणाघात शिवतारे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?

संजय राऊत यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करण्यापेक्षा. उद्याच्या उद्या १२ तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या, उगाच बाष्कळ बडबड करू नका. आता तुमच्या चेहऱ्याचा सुद्धा महाराष्ट्राला वीट आला आहे. ज्या आमदार खासदारांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहात त्यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करत असाल तर आधी तुम्ही राजीनामा द्या आणि महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊन दाखवा असे आवाहनही शिवतारे यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा