विजय रूपाणी यांना भरसभेत आली भोवळ

विजय रूपाणी यांना भरसभेत आली भोवळ

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे काल (१४ फेब्रुवारी) चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. सध्या वडोदरा महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते निजामपुरामध्ये एका प्रचासभेत बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांना चक्कर आली आणि ते स्टेजवरच कोसळले.

विजय रूपाणी हे ऑगस्ट २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर २०१४ मध्ये आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्यानंतर विजय रूपाणी हे मुख्यमंत्री झाले होते.

सध्या गुजरातमध्ये अनेक शहरांच्या महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे तिथे राजकीय वातावरण तापलेले आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत. भाजपकडूनसुद्धा येथे जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपतर्फे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात आहेत. यावेळी वडोदरा येथील निजामपुरा भागात त्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी  प्रचारसभेत बोलत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि भाषण सुरु असतानाच ते अचानक स्टेजवरच कोसळले. रक्तदाब कमी झाल्यामुळे ते कासळले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रसंगानंतर आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version