ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळेंचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळेंचे निधन

महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास विजय कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते.

विजय कांबळे यांनी आयुष्यभर कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला. ‘कारखाने टिकले पाहिजेत आणि कामगार जगले पाहिजेत’ अशी त्यांची कायम भूमिका असायची. आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबईतील प्रसिद्ध अशा इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक असावे अशी मागणी त्यांनी सातत्याने केली. तर तितक्याच ताकदीने त्याचा पाठपुरावाही केला. या मागणीच्या पूर्ततेसाठी आवश्यक तो लढा देखील उभारला. डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

हे ही वाचा:

पालिका कर्मचारीच मागत होता फेरीवाल्यांकडून १०-१० रुपये…वाचा!

कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातली धक्कादायक घटना

‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ आता काँग्रेसचे घोषवाक्य असेल

…असा उठवला सीएने आपल्या नावाचा फायदा! वाचा…

२०१४ साली कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते कुर्ला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार होते. कांबळे यांच्या निधनाने एक लढवय्या नेता गमावल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version