तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध

तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध

पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. आत्तापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पार पडले आहेत. या दरम्यानच ममता दीदींच्या तृणमुल काँग्रेसच्या एका नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो नेता लोकांना सरळ सरळ धमकावताना दिसत आहे. भाजपाच्या आयटी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे सहप्रभारी अमित मालविय यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

तृणमुलचा नेता आणि कोलकाता शहराचे माजी महापौर फिरहाद हकिम हे या व्हिडिओमध्ये धमकावताना दिसत आहे. यात ते म्हणतात, ही निवडणुक होऊन जाऊ दे मग या सीआयएसएफच्या विरुद्ध कारवाईच करतो असे ते धमकावताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

मुंबई पाठोपाठ दिल्लीतूनही मजूरांचे स्थलांतर

युजीसी, एनइटीची परीक्षाही लांबणीवर

अमेरिकेत सोळा वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

फडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस

या व्हिडिओसोबतच मालिवय यांनी ममता दीदींना लक्ष्य केले आहे. ते म्हणतात,

जर ममता बॅनर्जी त्यांच्या उमेदवारांनाच थेट केंद्रीय निमलष्करी दलांविरुद्ध हिंसाचार भडकवण्यासाठी प्रोत्साहन देत असतील तर त्यांचे चेले यापासून दूर कसे राहतील

असा सवाल देखील त्यांनी उठवला आहे.

बंगालच्या निवडणुकांमध्ये हिंसाचार ही काही नवीन बाब राहिली नाही. यापूर्वीच्या निवडणुकांच्या वेळी देखील तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. गेल्या काही टप्प्यांत देखील कमी अधिक प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या निवडणुकीदरम्यान सुरक्षेसाठी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रीय बल तैनात करण्यात आले आहे

Exit mobile version