भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी महात्मा गांधी यांना गेल्या शतकातील महापुरुष तर, मोदी यांना या शतकातील ‘युगपुरूष’ संबोधले. ते जैन विचारवंत श्रीमद राजचंद्र यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त बोलत होते. ते महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक मार्गदर्शकही होते.
‘महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यात्या त्या मार्गावर आणले, ज्या मार्गावर आपणाला नेहमीच जायचे होते. महात्मा गांधी गेल्या शतकातील महापुरुष होते. नरेंद्र मोदी या शतकातील युगपुरुष आहेत,’ असे धनखड यावेळी म्हणाले.
त्यांनी यावेळी श्रीमद राजचंद्र यांच्या भित्तीचित्राचेही अनावरण केले. श्रीमद राजचंद्र जन्म १८६७मध्ये तर मृत्यू १९०१मध्ये झाला होता. त्यांना जैन धर्माची त्यांच्या शिकवणीसाठी आणि महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाते.
हे ही वाचा:
‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’
ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक
वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली
पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक बाब समान आहे. ते दोघेही राजचंद्र यांच्या मूल्यांचे पालन करतात,’ असे धनखड यांनी सांगितले. ‘या राष्ट्राच्या विकासाला विरोध करणारी ताकद आणि या देशाची प्रगती सहन होऊ न शकणाऱ्या शक्ती एकत्र आल्या आहेत. जेव्हा देशात काही चांगले होऊ लागले असते तेव्हा ते वेगळ्याच भूमिकेत येतात. असे होता कामा नये. हे संकट खूप मोठे आहे,’ असे धनखड यांनी सांगितले.