विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमधले उसळलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंवर अत्याचार झाले. अशा पीडित हिंदूंच्या मदतीसाठी देशभरातील हिंदू समाजाने एकत्र यावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रक जाहीर करून यासंबंधीचे आवाहन केले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारानी सारा देश हादरला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी कायदा हातात घेत भाजपाच्या कार्यकर्ते, नेते, मतदारांपासून ते थेट केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांपर्यंत सर्वांनाच झुंडशाहीचा अनुभव दिला. लूट, मारहाण, हत्या इथपासून सामूहिक बलात्काराच्या घटनांपर्यंत हिंसेची अनेक रूपे पाहायला मिळाली. याचा फटका अंदाजे चाळीस हजार हिंदूंना बसला असून अकरा हजार हिंदू बेघर झाले आहेत.तर १४२ महिलांवर अमानुष अत्याचार केले गेले आहेत. पाच हजारपेक्षा अधिक घरे उध्वस्त करण्यात आली. सात हिंदू वस्त्यांवर बुलडोजर चालवून एका रात्रीत तिथे मशिदी बांधण्यात आल्या आणि जिहादींनी तिकडे कब्जा केला अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवरही अतिशय अमानवी अत्याचार करण्यात आले.
हे ही वाचा:
लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा
डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार
देवेंद्रजी दौऱ्यावर, मुख्यमंत्री आरामखुर्चीवर
अशा परिस्थितीत या पीडित बंधू-भगिनींना सहकार्य करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या ०४०७२०१००१७२५० या खात्यावर किंवा भारत कल्याण प्रतिष्ठानच्या ०४०७२०१००१९९६० या खाते क्रमांकावर पैसे जमा करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. तर मदत पाठवल्यानंतर नाव, दूरध्वनी क्रमांक,केलेली मदत, त्याचा रेफरन्स याची माहिती kotishwar.sharma@gmail.com या ईमेल वर पाठवण्यात यावी असे विश्व हिंदू परिषदेने सांगितले आहे.