बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळवार, ४ मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढत विहिंपतर्फे आपली भूमिका मांडण्यात आली. हिंदू समाजाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे आणि जर बंगालमधील हिंसा थांबली नाही तर तो अधिकार वापरावा लागेल असा इशारा विहिंपने दिला आहे.
२ मे रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून ममता बॅनर्जी यांच्या विजयावर मोहोर उमटली आणि पश्चिम बंगालमध्ये हिंसेचा तांडव सुरु झाला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले, कार्यलयांची जाळपोळ झाली. महिलांवर अतिप्रसंग करण्यात आले. या साऱ्या हिंसाचाराने देश हादरून गेला आहे. अशातच विहिंपने आपली भूमिका जाहीर केली आहे. मंगळवार, ४ मे रोजी यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक विहिंपने काढले आहे आणि ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.
प्रेस वक्तव्य :
बंगाल में हिंसा, आगजनी व लूटपाट पर अबिलम्ब विराम लगे: @MParandeVHP pic.twitter.com/O6FmE00piS— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) May 4, 2021
हे ही वाचा:
बंगालच्या सत्ताधाऱ्यांचे रक्तरंजित राजकारण भाजपा सहन करणार नाही
बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण
बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा
पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध
काय आहे विहिंपची भूमिका?
“तृणमूल काँग्रेस पक्षामधील असामाजिक गुंड आणि जिहादी घटक हे हिंदूंना लक्ष्य करत आहेत. सामाजिक हिंसाचार, जाळपोळ, त्यांची घरे फोडणे आणि लुटणे, मंदिरांवर हल्ले करणे, त्यांच्या आयाबहिणीच्या अब्रूवर हात टाकणे. त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाळपोळ करणे असे अनेक प्रकार सुरु आहेत. हे सर्व प्रकार घडत असताना पोलीस हे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. या सगळ्या हिंसाचारात आत्तापर्यंत डझनभर लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यसरकार या विषयात पूर्णपणे निष्क्रिय ठरले असून केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी. अशा परिस्थितीत हिंदू समाजाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार ते कधीही वापरू शकतात.” असा इशारा विहिंपने दिला आहे.
A High level VHP Bengal Delegation lead by the Kshetra sangathan mantri Sapan mukherjee met Hon’ble Governor of West Bengal @jdhankhar1 this evening. It handed over a memorandum regarding violence in the state. pic.twitter.com/TPiYdcTsJ4
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) May 4, 2021
मंगळवारी विहिंपच्या एका शिष्टमंडळाने बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेतली असून राज्यात घडणाऱ्या परिस्थितीबाबाबत चिंता व्यक्त करत राज्यपालांना निवेदन दिले.