26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणउपराष्ट्रपती का झाले व्यथित?

उपराष्ट्रपती का झाले व्यथित?

Google News Follow

Related

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू मंगळवारी (१० ऑगस्ट) राज्यसभेत भावूक झाल्याचं पहायला मिळालं. मंगळवारी राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडू नाराज झाले. त्यांनी विरोधी खासदारांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. राज्यसभा सदस्यांचं हे असभ्य वर्तन पाहून व्यंकय्या नायडू व्यथित झाले. उपसभापती व्यंकय्या नायडू काही खासदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळाचं सत्र कायम ठेवलं. पेगासस आणि इतर मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरत खासदारांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे अनेकदा सभागृह तहकूब करावी लागली. त्यावर नाराज होत व्यंकय्या नायडू म्हणाले, ”पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून सभागृहाचा अवमान होत आहे, याचे मला खूप वाईट वाटते. असे वाटते जसे काही सभागृहात काही वर्गांमध्ये स्पर्धा सुरू आहे. आपल्या मंदिरांमध्ये, भक्तांना गर्भगृहात काही मर्यादेपर्यंत प्रवेश करण्याची परवानगी आहे. कुणी त्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. सभागृहाच्या गर्भगृहात अशाप्रकारे प्रवेश करणे म्हणजे एकप्रकारे त्याला अपवित्र करणं आहे आणि हे वर्षानुवर्षे घडत आले आहे.”

हे ही वाचा:

राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई

भांडूपमध्ये बसचा भीषण अपघात

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

मंगळवारी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. यावेळी काही खासदार राज्यसभेतल्या अधिकारी आणि पत्रकारांची आसनव्यवस्था असते त्या टेबलवर चढल्याचं पहायला मिळालं. एका खासदाराने तर शासकीय कागदपत्र सभापतींच्या आसनाकडेही भिरकावली. खासदारांच्या या कृतीनंतर नायडू यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण खासदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

यासोबतत काही खासदारांनी सभागृहात सुरू असलेला गोंधळ मोबाईलवर शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यातून जनतेला सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग केली जाते हे समजलं असेल. काही सदस्यांनी स्वतःला आक्रमक दाखवण्याची स्पर्धा याला कारणीभूत असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा