भारताच्या उज्वल परंपरांना शिक्षणात स्थान द्यायला हवे

भारताच्या उज्वल परंपरांना शिक्षणात स्थान द्यायला हवे

भारताच्या उज्वल परंपरांना शिक्षणात स्थान द्यायला हवे असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. हरिद्वार येथील दक्षिण आशियाई शांतता आणि सलोखा संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारताच्या प्राचीन काळातील ज्ञानदान परंपरा आणि पारंपरिक ज्ञान समजून घेत ते अधिक आधुनिक आणि कालसुसंगत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे नायडू यांनी म्हटले आहे.

शनिवार, १९ मार्च रोजी उपराष्ट्रपतींच्या हस्ते हरिद्वार इथल्या दक्षिण आशियाई शांतता आणि सलोखा संस्थेचे उद्घाटन झाले. भारताच्या,जगभर प्रसिद्ध असलेल्या,प्राचीन शिक्षण परंपरा परदेशी आक्रमक-शासकांच्या काळात लुप्त झाल्या, अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

हे ही वाचा:

टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

देशात दीर्घकाळ असलेल्या वसाहतवादी सत्तेमुळे देशातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित राहिला, यात महिलांचाही समावेश होता.केवळ उच्च वर्गातील मोजक्या लोकानांच औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली. “त्यामुळे आज सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे, असे केले तरच आपली शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक आणि लोकशाहीपूर्ण होऊ शकेल,” असे ते म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणात, आपल्या शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, त्यांनी आनंद व्यक्त केला. जे जे भारतीय आहे, ते सगळे हीन दर्जाचे आहे, असे समजणाऱ्या मानसिकतेविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज तणावग्रस्त जगाला, अनेक सामाजिक आणि इतर समस्यांचा सामना करावा लागत असतांना, मानवतेच्या विकासासाठी, जगात शांतता आणि सलोखा नांदणे काळाची गरज आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. “शांततेचा सर्व जगावर परिणाम होणे अपरिहार्य असते, त्यातूनच, सामाजिक सलोखा निर्माण होऊन,प्रगती आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो,” असे ते म्हणाले.

Exit mobile version