24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणकाँग्रेसच्या केरळमधील पदयात्रेत पोस्टरवर सावरकरांची छबी

काँग्रेसच्या केरळमधील पदयात्रेत पोस्टरवर सावरकरांची छबी

सावरकरांचा फोटो काढून मग लावला गांधीजींचा फोटो

Google News Follow

Related

एरवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत खालच्या भाषेत उद्धार करणारे, मी सावरकर नाही, गांधी आहे असे म्हणणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेदरम्यान लावण्यात आलेल्या पोस्टरवर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावण्यात आल्याने गोंधळ उडाला.

केरळमधील कोची येथे सध्या ही पदयात्रा सुरू आहे. त्यावेळी चेंगमनाड पंचायत या गावात ही यात्रा सुरू असताना तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लांबलचक पोस्टर तिथे लावले होते. त्यावर सावरकरांचे चित्र प्रसिद्ध केलेले दिसत होते. चंद्रशेखर आझाद आणि गोविंद वल्लभ पंत यांच्या फोटोदरम्यान सावरकरांचा फोटो दिसत होता. हे पोस्टर आणि त्यावर दिसणारे सावरकरांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सर्व स्तरातून काँग्रेसवर टीका होऊ लागली. तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी सावरकरांचा फोटो झाकला आणि त्यावर गांधीजींचा फोटो लावला. त्याचे स्पष्टीकरण देताना त्या कार्यकर्त्यांनी सांगितले पोस्टर चुकून बनविण्यात आले असून त्यावर मग सावकरांच्या फोटोच्या वर गांधीजींचा फोटो लावण्यात आला. तिथल्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांने सांगितले की हे पोस्टर नेमके कसे बनले याची माहिती नाही.

हे ही वाचा:

‘मालाडची स्मशानभूमी तोडलीत; मढचे स्टुडिओ का तोडले नाहीत?’

दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी नाही

एबीजी शिपयार्डचे माजी सीएमडी ऋषी अग्रवाल यांना अटक

मोबाईल चार्जिंगच्या नादात ब्रेकच्या जागी दाबले एक्सलरेटर आणि

 

या घटनेनंतर भाजपाने अर्थातच या प्रकरणात उडी घेतली. भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवर नमूद केले की, राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांना उद्देशून म्हटले की, त्यांनी पंजाब येथील तुरुंगात असताना आपल्या सुटकेसाठी ब्रिटिशांकडे अर्ज केला होता. त्याद्वारे आपल्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

भाजपा प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की, राहुल जी तुम्ही कितीही इतिहास आणि सत्याचा अपलाप केलात तरी सावरकर हेच वीर होते हेच समोर येईल. जे हे सत्य लपवतील ते कायर म्हणजेच भित्रे असतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा