27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणवेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात, वेदांताच्या अध्यक्षांची घोषणा

वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात, वेदांताच्या अध्यक्षांची घोषणा

Google News Follow

Related

वेदांता- फॉक्सकॉन’ कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दीड लाख कोटींच्या प्रकल्पातून जवळपास एक ते दीड लाख लोकांना रोजगार मिळणार होता, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. आता वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता- फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. अनिल अग्रवाल यांच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानले असून, त्यांनी याचवेळी टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी चार ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. वेदांता- फॉक्सकॉन अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीसाठी व्यावसायिकरित्या साईटचे मुल्याकंन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. या प्रकल्पाची सुरुवात गेल्या दोन वर्षांपूर्वी झाली आहे. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये जसे की, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या राज्यातील सरकारशी तसेच केंद्र सरकारशी संलग्न आहोत आणि आम्हाला उत्कृष्ट पाठिंबा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी गुजरात सरकराने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे हा प्रकल्प आम्ही गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत आमची बैठक पार पडली होती. या बैठकीत महाराष्ट्राने स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, आम्हाला हा प्रकल्प एकाच ठिकाणी करायचा असून, व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरात राज्य निवडले आहे.

अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही संपूर्ण भारतात इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली अशी माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली आहे. यातून वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्ये आभार मानले आहेत. तसेच फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरदेखील दिले आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

पुढे विरोधकांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले, मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा