वाझेने दिला जबाब
अँटिलिया घोटाळ्यात अटक केलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे,
वाझे म्हणाले की, अनिल देशमुख किंवा त्यांचे कर्मचारी किंवा इतर कोणीही त्यांच्या नावाने त्यांच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही.
सचिन वाझे याची चांदीवाल आयोगासमोर १०० कोटी वसुली प्रकरणात उलटतपासणी सुरू आहे. आज पुन्हा देशमुख आणि वाझे यांना आयोगासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी वाजे याने अनिल देशमुख यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली नव्हती असे आयोगासमोर सांगितले.
सोमवारी देखील वाझे आणि देशमुख हे आयोगासमोर आले होते त्यावेळी देखील वाजेने टीआरपी प्रकरणाच्या तपासाबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केलं होतं असे आपल्या जबानीत त्याने चांदीवाल आयोगाला माहिती दिली होती.
हे ही वाचा:
ओमिक्रॉनचा पहिला बळी; ब्रिटनमध्ये झाली नोंद
‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’
अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी
नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी
मात्र रायगडच्या प्रकरणात झालेल्या अर्णब गोस्वामीच्या अटकेत आपला मर्यादीत सहभाग असल्याची वाझेने कबूली दिली.
रायगडच्या टीमला गोस्वामीचं घर दाखवणं आणि बाकी बंदोबस्ताची व्यवस्था करणं इतकीच जबाबदारी दिली होती
असे वाझेने चांदिवाल आयोगासमोर सोमवारी कबुली दिली होती.