अँटिलिया स्फोटक प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने मागे चांदीवाल आयोगाला दिलेल्या जबाबात अनिल देशमुखांनी आपल्याला वसुलीचे आदेश दिले नव्हते असे म्हटले होते पण आता त्याने आपला जबाब बदलला आहे. चांदीवाल आयोगाला दिलेल्या अर्जात त्याने देशमुख यांनीच आपल्याला वसुलीचे आदेश दिले होते असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
सचिन वाझेने उलटतपासणीवेळी चांदीवाल आयोगाला सांगितलं होतं की, अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले नव्हते. मात्र आता त्याने केलेल्या अर्जात हो मला देशमुखणी वसुलीचे आदेश दिले होते अस उत्तर नोंदवण्याची मागणी केली होती. ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझा मानसिक छळ केला आणि मला त्रास दिला. या सगळ्या गोष्टी त्यांच्या राजीनाम्यानंतर देखील सुरूच होत्या.’ असा गंभीर आरोपही वाझेने यावेळी केला आहे.
सचिन वाझेने अर्जात असही म्हटलेलं आहे की, देशमुखांच्या सहकाऱ्यांनी मला वसुलीसांदर्भात सूचना केल्या होत्या. अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून मी त्यांच्या लोकांना वसूल केलेले पैसे दिले. हा अर्ज वाझेने चांदीवाल आयोगाकडे जबाब बदलण्यासाठी केला असला तरी आयोगाने हा अर्ज फेटाळला.
वाझेने तुरुंगात होत असलेली आपली परवडही मांडली आहे. त्याने म्हटले आहे की, मला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आल्यापासून मला गरजेच्या बेसिक मेडिकल गोष्टी पुरवल्या नाहीत. मला गोरेगावच्या केसमध्ये गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. देशमुख हे पॉवरफुल व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
यूपी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का…
काय आहेत ‘हिजाब’बाबत घटनात्मक तरतुदी आणि इतर देशांतील स्थिती?
अरुणाचलमध्ये हिमस्खलनात अडकलेले सात जवान शहिद
माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही कारण मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझं अँजिओप्लास्टी ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा मला बेसिक मेडिकल ट्रीटमेंट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीर सिंग यांना खोट्या खडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं.