वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

रात्री दहा नंतर पोलिसांच्या वसुलीचे दर केले खुले

ठाकरे सरकारच्या काळात सचिन वाझे तुरुंगात जाऊनही १०० कोटींची वसुली थांबलेली नाही असा आरोप भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे. “सचिन वाझे तुरूंगात जाऊनही हफ्ता वसूली थांबलेली नाही. मुंबईतील १८०० पेक्षा अधिक अन महाराष्ट्रातील अनेक रेस्टोरेंट बार मधून रात्री १० नंतर हॉटेल सुरू ठेवण्यासाठी दर १ तासाला मुंबईतील वेस्टर्न भागात २५ हजार तर ईस्टर्न भागात दर एका तासाला १५ हजार वसूली रेट सुरु आहे?” असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

ठाकरे सरकारने कोरोना काळात लॉकडाउन नंतरही रेस्टोरेंट, बार आदींना रात्री १० पर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. अशावेळी रेस्टोरेंट, बार मालकांकडून रात्री १० नंतरही आस्थापनं सुरु ठेवण्यासाठी पोलिसांना लाच दिली जाते. यामध्ये मुंबईच्या पश्चिमी भागात दर तासाला रेस्टोरेंट, बार मालकांकडून २५ हजार तर सेंट्रल लाईनवरील किंवा ईस्टर्न भागात दर तासाला १५ हजार हा पोलिसांचा वसुलीचा दर असल्याचेही राम कदम म्हणाले आहे.

“ह्या पैशाचे वाटेकरी कोण वरीष्ठ अधिकारी अन मंत्री अणि नेते ? ह्या हफ्ता वसूली साठीच रात्री १० वाजता हॉटेल बंद चा नियम मुद्दाम बनवला आहे का ?आमचे खुले आव्हान आहे ह्या सरकारला हिम्मत असेल तर रात्री १० नंतर मुंबई महाराष्ट्रात फिरून दाखवा अन स्वतः डोळ्यानी पहा हफ्तावसुलीचा उघडा नाच.” असंही राम कदम म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात

महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?

नवरात्रीच्या मिरवणुकीवर गाडी घातल्याचा भयानक व्हिडिओ समोर

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

अशा पद्धतीने उघड उघड भ्रष्टाचार होत असताना रात्री १० नंतर रेस्टोरंट आणि बार बंद ठेवण्याचा सरकारी आदेश का रद्द केला जात नाही असा सवालही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर राम कदम यांनी ठाकरे सरकारला रात्री १० नंतर महाराष्ट्रात फिरत सत्य परिस्थिती आणि हफ्तावसुली पाहण्याचे आवाहनही केले.

Exit mobile version