वरुण सरदेसाईंना लागली संस्कारांची चिंता

वरुण सरदेसाईंना लागली संस्कारांची चिंता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत ज्यांच्या नेतृत्वाखाली राडेबाजी झाली, त्या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाईंनी आता संस्कारांबद्दल बोलण्यास सुरुवात केली आहे.

एका कार्यक्रमात त्यांनी भारतीय जनता पार्टीला संस्काराचे धडे देण्याचा प्रयत्न केला आहे. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत राडा केला गेला. त्यावेळी वरुण सरदेसाईंच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. त्यावेळी पोलिसांना शिवीगाळ करतानाचा सरदेसाई यांचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला होता. आता त्याच वरुण सरदेसाई यांनी संस्काराबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हेच संस्कार चालतात का, असा सवाल त्यांनी या कार्यक्रमात विचारला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून संस्काराशी आपला काय संबंध आहे, हे गेल्या दोन दिवसांत वरुण सरदेसाई यांनी दाखवून दिले आहे, असा सूर उमटला आहे.

हे ही वाचा:

सीडीएस, जनरल बिपिन रावत यांनी तालिबानला दिला ‘हा’ इशारा

मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोचा चिखल

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत ‘भोक पडलेल्या फुग्याला’ एवढे का घाबरत आहेत?

याच वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारने घातलेल्या कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत युवा सेनेची सभा घेतली होती. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे जे स्वतः संस्काराची फिकीर करत नाहीत, त्यांनी संस्काराचे धडे का द्यावेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सत्तेत आहोत त्यामुळे रोज तलवारी काढता येणार नाहीत. आक्रमकता ही बोलण्यातून व्यक्त व्हायला हवी, असे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. त्यांनी स्वतःचे ‘आक्रमक’ आंदोलन चुकीचे होते याची तर कबुली या वक्तव्यातून दिली नाही ना, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला गेला आहे.

Exit mobile version