कांदिवलीमधील भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः छटपुजेला विरोध करतोय, हा वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ स्वरूपाचा असल्याची टिका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
हेही वाचा..
मातोश्री-२मध्ये शिवभोजन थाळीचा हातभार किती?
फटाक्यांचे अमिष दाखवून ८ वर्षीय मुलावर लैगिंक अत्याचार
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!
जरांगें पाटलांचा बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल
आमदार भातखळकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि आपण स्वतः कांदिवली पूर्व विधानसभेत छटपुजा अत्यंत उत्साहात साजरी करतो. येथे काँग्रेसच्या माजी नगरसेविका छटपुजा करत होत्या मात्र लोकांनी त्यातील आर्थिक गफलतीविषयी तक्रारी केल्या, म्हणून मुंबई महापालिकेने त्यांना परवानगी नाकारली ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे हनुमान नगरमध्ये दोन ठिकाणी, पोयसरमध्ये तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी छटपूजा साजरी करत असते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच उत्साहात आणि जोशात लोखंडवाला येथील महाराणाप्रताप उद्यान येथे भाजपच्या वतीने जोरदार छटपुजा साजरी करण्यात येणार आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी अशा स्वरुपाचे खोडसाळ आरोप करू नयेत, असेही आमदार भातखळकर म्हणाले.