वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरेंच्या कारस्थानामुळे धारावीत जमाव उतरला!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दावा

वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरेंच्या कारस्थानामुळे धारावीत जमाव उतरला!

मुंबईतील धारावीमध्ये शनिवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. धारावीमधील मेहबुब ए सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता आणि यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या घटनास्थळी पोहचल्या होत्या. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धारावीमधील परिस्थितीला वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे.

किरीट सोमय्या हे सोमवार, २३ सप्टेंबर रोजी धारावीत पोहचले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “धारावीतील प्रकरण हे वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांचे हे कटकारस्थान आहे. मुस्लीम नेत्यांना हाताशी धरून मशिदीच्या नावाने बोगस पत्र तयार करण्यात आलं. मशिदीवरील कारवाई २१ सप्टेंबर रोजी होणार होती. त्यामुळे २० तारखेला म्हणजेच आदल्या दिवशी कळवा- मुंब्रा भागातून बस भरून माणसं धारावीमध्ये आणण्यात आली,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांना माहिती आहे की, माशिदिमधील एक हजार स्क्वेअर फूट रुंदीचे आणि ४० फूट उंच बांधकाम हे अनधिकृत आहे. मशीदमधील ट्रस्टीलाही याबद्दल कल्पना आहे. तसे लिहून कबूल केलं आहे. तरीही मशीद तोडायला मोदींची माणसे येत असल्याचे सांगून लोकांना भडकवण्यात आले. त्यामुळे यासंबंधी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आणि हे पत्र व्हाराल केलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. ठाकरे गटाचे नेते, वर्षा गायकवाड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध’

‘लापता लेडीज’ चालला ऑस्कर वारीला!

‘दुर्गापूजा करायची असेल तर अल्लाहच्या नावाने ५ लाख द्या, नाहीतर कापले जाल’

पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’

धारावीच्या परिसरात मेहबुब ए सुभानिया ही मशिद असून या मशिदीचा काही भाग अवैध आहे. त्यामुळे शनिवारी मुंबई महानगरपालिकेचे पथक हा अनधिकृत भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांना अडवले आणि पथकाच्या गाडीच्या काचाही फोडल्या. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आणि लोकांनी कायदा व सुव्यवस्था राखून दगडफेक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले गेले. पुढे तणावाची परिस्थिती निर्माण होताच या कारवाईला स्थगिती देण्यात आली.

Exit mobile version