महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटच्या कचाट्यात राज्याचे नागरिक येताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावरही ओमीक्रॉनचे सावट पाहायला मिळाले आहे. अनेक सरकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आले आहे.
वर्षा गायकवाड यांनी स्वतः त्यांना कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. काळ संध्याकाळी कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर मी माझी कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोरणाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला विलग केले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असे गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता
काँग्रेस स्थापनादिनी पक्षध्वज खाली कोसळला आणि…
सध्या राज्यासह देशभरात कोरोना पुन्हा हात पसरताना दिसत आहे. राज्यात सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्या संदर्भात सुतोवाचह करण्यात आले आहे. राज्यासह देशात तिसरी लाट येऊ नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत. पण तरी देखील राज्याच्या विविध भागातून पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती पुढे येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.