विशाखापट्टणममधील कांचरापलेमजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे, यामुळे डब्याच्या विंडशील्डच्या काचा फुटून नुकसान झाले आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेकीच्या घटना सातत्याने समोर येत असून नुकतेच पश्चिम बंगालमध्ये ट्रेनवर दगडफेक झाली होती, तर आता आंध्र प्रदेशातून वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत एका डब्याच्या खिडकीच्या काचा फुटलया आहेत.आरपीएफने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आंध्र प्रदेशात अजूनही औपचारिकपणे सुरू झालेली नाही. सध्या ती ट्रायल रननंतर विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून मेरीपलेम येथे देखभाल करण्यासाठी जात होती. विशाखापट्टणममधील कांचरापलेमजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे डब्याच्या विंडशील्डचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
तामिळनाडूमध्ये ३५६ कलम लागू करा! सोशल मीडियावर #Article 356 हा ट्रेंड
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च
१९ जानेवारीला पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे मात्र, त्याआधीच या रेल्वेवर दगडफेकीची घटना घडणं हि चिंतेची बाब आहे. दरम्यान या संदर्भात डीआरएम अनूप यांनी सांगितले की, अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून कोचिंग कॉम्प्लेक्सच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे अज्ञातांनी दगडफेक करून नुकसान केले. याप्रकरणी आरपीएफने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास चालू आहे.