भाजपाच्या वनाथी यांनी दिली कमल हसनना धोबीपछाड

भाजपाच्या वनाथी यांनी दिली कमल हसनना धोबीपछाड

तामिळनाडूतील दक्षिण कोईम्बतूर मतदारसंघातून तामिळ सुपरस्टार कमल हसन यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या वनाथी श्रीनिवासन यांनी कमल हसन यांचा पराभव केला आहे. तर काँग्रेसचे उमदेवार मयुरा जयकुमार यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

२ मे रोजी देशातील महत्वाच्या अशा पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीच्या नागरिकांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकला हे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष सत्ता स्थापन करत आहे. पण अशात राज्यातील काही निकाल विशेष लक्ष वेधून गेले. या निवडणुकीत तामिळ सुपरस्टार कमल हसन याने मक्कल निधी मैअम या पक्षाची स्थापना करून आपले नशीब आजमावले स्वतः हसन याने कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली होती. त्याच्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन आणि काँग्रेसचे तामिळनाडू राज्याचे कार्याध्यक्ष मयुरा जयकुमार यांचे आवाहन होते.

हे ही वाचा:

पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

मोदींनी केले विरोधकांचे अभिनंदन

निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक

ममता बॅनर्जी पराभूत

या अटीतटीच्या तिरंगी लढतीत सुरवातीला कमल हसन हे आघाडीवर होते तर वनाथी श्रीनिवासन या तीन नंबरला होत्या. पण जसजसे मतमोजणी पुढे सरकत गेली तसतशा वनाथी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि विजयश्री खेचून आणली. हा मतदारसंघ हा अण्णाद्रमुक पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. २०१६ सालीही श्रीनिवासन यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. वनाथी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून आपल्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version