हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून लस खरेदी केली नाही?

हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून लस खरेदी केली नाही?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. लस तुटवड्याच्या मुद्द्यावरुन हे आंदोलन पुकारण्यात आलं. जगतापांच्या या आंदोलनावर टीका करत, भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. १ मे पासून राज्यांना लस खरेदीची मुभा असताना लस खरेदी का झाली नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे. हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून ही दिरंगाई होतेय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

“काँग्रेस नेते भाई जगताप लसींच्या मुद्यावर आंदोलन करतायत. सर्व बड्या हॉस्पिटलमध्ये लसी उपलब्ध आहे, फक्त राज्य सरकारला मिळत नाहीयेत. १ मे पासून राज्यांना लस खरेदीची मुभा असताना लस खरेदी का झाली नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे. हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून ही दिरंगाई होतेय का?” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

“जसा संजय राठोडांवर शक्तिप्रदर्शन केल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तसाच भाई जगतापांवरसुद्धा गुन्हा नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम हे सर्वसामान्य जनतेच्या पोटावर लाथ मारण्यासाठी आहेत. या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकरता नाहीत. त्यामुळे भाई जगतापांवर तातडीने गुन्हा दाखल करावा ही भाजपा म्हणून माझी मागणी आहे.” असं भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा:

ट्विटरचा आडमुठेपणा कायम

१०० कोटींची वसूली आता ३०० कोटींची?

…तर मग तुमची गरजच काय?

कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा घट, १.७३ लाख नवे रुग्ण

“लसींचा तुटवडा, लसी परदेशात पाठवल्या ही भाई जगतापांनी केलेली टीका बकवास आहे, याला वस्तुस्थितीचा आधार नाही. १ मेपासून देशात निर्माण होणाऱ्या ५०% लसी राज्य सरकार खरेदी करू शकतं असं असताना सुद्धा राज्य सरकारने एक लससुद्धा खरेदी का नाही केली? अपोलो हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, रिलायन्स फाऊंडेशन, टीसीएस, सिम्बॉयसिस या सगळ्यांनी लसी खरेदी करून आपापल्या लोकांना दिल्या. तर या राज्यातील गरीब जनतेला सरकारने लस का दिली नाही? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली जनतेची फसवणूक करतायत. आमची मागणी आहे, मुंबई महानगर पालिकेने आणि राज्य सरकारने तातडीने मोफत लसीकरणाला सुरवात केली पाहिजे.”  अशी प्रतिक्रिया भातखळकरांनी दिली.

Exit mobile version