27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणग्लोबल टेंडरच्या नावावर लस घोटाळा?

ग्लोबल टेंडरच्या नावावर लस घोटाळा?

Google News Follow

Related

मुंबई महापालिकेने कोविड लसीसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. तर हा घोटाळा लपवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून टेंडरची मुदत वाढवण्यात आल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. सोमैय्या यांच्या आरोपांमुळे राज्यात नवे राजकारण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेची सत्ता उलथवून महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. त्यासाठी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे. शिवसेना शासित मुंबई महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत कोविड लसीसाठी ग्लोबल टेंडर काढले. अशा पद्धतीच्या टेंडर काढणारी मुंबई महापालिका ही जगभरातील पहिली महानगरपालिका ठरली.

हे ही वाचा:

भारताने पार केला २० कोटी लसीकरणाचा टप्पा

ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय

रा.स्व.संघाच्या सेवाकार्याने कम्युनिस्टांना पोटदुखी

नालेसफाई, कचरा सफाईच्या नावाखाली तिजोरीचे सफाई

सुरुवातीला या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न आल्यामुळे त्याची मुदत वाढविण्यात आली. काल म्हणजेच मंगळवार, दिनांक २५ मे रोजी या टेंडरची मुदत संपत होती. सुरुवातीला या टेंडरच्या प्रतिसादात ३ निविदा आल्या होत्या. तर शेवटच्या एका तासात ५ निविदा आल्या. या सार्‍या निविदा बोगस असून यात कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरची मुदत वाढवून ३० जून पर्यंत पुढे नेली आहे असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

या आधी एप्रिल महिन्यात सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने आणि ठाकरे सरकारने रेमडेसिवीरचा घोटाळा केला होता आणि आता कोविड लसीचा घोटाळा केला आहे असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा