मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. त्यात महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनता रोज भरडली जात आहे. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन आता काही महिने झाले तरीही महाराष्ट्र सरकारचा लसीकरणच्या बाबतीत सावळा गोंधळ सुरुच आहे. शुक्रवार १४ मे रोजी मुंबई महापालिकेकडून शनिवारी १५ मे आणि रविवार १६ मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील लसीकरण बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी महापालिकेवर निशाणा साधला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून महापालिकेला आणि ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

हे ही वाचा:

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

मोदी सरकारच्या बदनामीचा कट धुळीला

शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चिंता वाहणाऱ्या मोदी सरकारचे अभिनंदन

ठाकरे सरकार खोटं बोलत होतं- विनायक मेटे

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करताना ठाकरे रुग्ण वाढले की लगेच लोक डाऊन आणि गर्दी वाढली की नसे करण बंद हे त्यांचे व्यवस्थापन असल्याचे म्हटले आहे. ट्विट करताना ते म्हणतात.

रुग्ण वाढले की लागलीच लॉकडाऊन आणि गर्दी वाढली की, लसीकरण बंद हे हतबुद्ध ठाकरे सरकारचे व्यवस्थापन. पळपुटे सरकार मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करणार आहे काय?

कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील जनता हैराण झाली आहे. गेले काही दिवस राज्यातील कोविडचे रुग्ण कमी होत आहेत. परंतु त्यामागे ठाकरे सरकारने कमी केलेल्या चाचण्या हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे सरकारने चाचण्या कमी करून रुग्ण संख्या लपवली असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने केला जात आहे.

Exit mobile version