27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणबॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे

बॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे

Google News Follow

Related

न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी ती त्याआधीपासूनच १८ ते ४४ वयोगटातील काही बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ही लसीकरण मोहीम मुंबई महानगरपालिकेने सुरू केली होती, हे आता उघड झाले आहे.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता हृतिक रोशन याची पत्नी सुझान खान हिच्यावर केलेल्या खास मेहेरबानीमुळे सरकारची ती घोषणा फसवी असल्याचे स्पष्ट होते आहे. ४२ वर्षीय सुझान खानने दोन दिवसांपूर्वी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेतल्याचे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाहीर केले होते. महाराष्ट्रात जर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, तर याचा अर्थ सुझान खानने ही घोषणा होण्याआधीच पहिला डोस घेतलेला आहे. कारण कोव्हिशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस यांच्यात ६ ते ८ आठवड्यांचे अंतर असावे लागते.

हे ही वाचा:

आलं अंगावर ढकललं कार्यकर्त्यावर

अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरणाला परवानगी द्या

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

मुंडेसाहेब असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती

एकीकडे लस नसल्यामुळे लोकांना लसीकरण केंद्रातून निराश होऊन घरी परतावे लागत असले तरी सेलिब्रिटींसाठी मात्र सगळे नियम मोडून लसी उपलब्ध केल्या जात आहेत. मग या सेलिब्रिटींचे चोचले सरकार का पुरवत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

सुझान खानने स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या ५० कर्मचाऱ्यांनाही हे डोस दिले असल्याचे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटले आहे. म्हणजेच अशा अनेक सेलिब्रिटींना पालिका प्रशासनाने असेच उपकृत केल्याची शक्यता आहे.

यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली असून एकीकडे फ्रंटलाइन वर्कर्सना कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन मिळत नाही. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागते आहे. पण सुझान खान आणि त्यांच्या ५० कर्मचाऱ्यांना मात्र नियमांच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीने डोस मिळतो, हे कसे काय याची चौकशी व्हायलाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांना डोस नाहीत, ज्यांना आवश्यक आहेत, त्याना नाहीत. जे नियमांत बसत नाहीत अशा सेलिब्रिटीना मात्र डोस मिळत आहेत. यामागे कुणाचा वरदहस्त आहे आणि कोण मंत्री आहे, याची चौकशी करण्याची मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा