उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. रविवार, २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी एकूण ७ नवीन मंत्र्याची उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उत्तर प्रदेश येथील राजभवनात या नवया मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी या सात नव्या मंत्र्यांना शपथ दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून सात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. २०२२ मध्ये होऊ घातलेल्या आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
पुरात सर्वस्व वाहून गेले आता कागदपत्रं आणायची तरी कुठून?
सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?
महाराष्ट्र अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीशी तर मुलींमध्ये कोल्हापूरशी झुंजणार
मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात
या मंत्रिमंडळ विस्तारात जितिन प्रसाद, छत्रपाल गंगवार, पलटू राम, संगीता बलवंत बिंद, संजीव कुमार, दिनेश खटीक, धर्मवीर प्रजापति अशा सात जणांनी शपथ घेतली आहे. यावेळी भाजपाकडून भौगोलिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या विस्तारात शपथ घेतलेले जितीन प्रसाद हे नुकतेच काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये आले आहेत. प्रसाद हे ब्राम्हण समाजातील एक मोठे नेते मानले जातात. तर शपथ घेतलेले आणखीन एक मंत्री छत्रपाल गंगवार हे बरेलीचे आमदार असून ते कुर्मी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेणारे पलटू राम हे दलित समाजातून येतात.
या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तारात संगीता बलवंत बिंद या एकमेव महिला मंत्री असून त्या ओबीसी आहेत. सोनभद्र येथील ओबरा विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले संजीव कुमार हे आदिवासी समाजातून येतात.
या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतलेले दिनेश खाटीक हे आणखीन एक दलित समाजाचे मंत्री असून ते मेरठ येथील हस्तिनापुर क्षेत्रातून येतात. तर त्यासोबतच धर्मवीर प्रजापति यांच्या रूपाने आणखीन एका ओबीसी चेहर्याला या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकाीच्या आधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याचे मानले जात आहे.