योगी सरकारचा मोठा निर्णय
योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने लसीकरणाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांना आता कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणताही पात्रतेचा निकष ठेवला नसून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना या मोफत लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे.
देशभरात सध्या एकीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तर दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. आजवरचा देशाचा लसीकरणाचा आकडा १२,७४,२८,८८७ इतका आहे. देशात सध्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लसीकरण अधीक जलद गतीने होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशात आता परदेशी लसींनाही परवानगी दिली जाणार आहे. तर १ मे पासून देशातील सर्वच प्रौढ नागरिक अर्थात १८ वर्षांवरील नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. अशातच आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण निःशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
फडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस
राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
अहमदनगरमध्ये ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत
सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला टाळेबंदीबाबत तूर्तास दिलासा
मंगळवार, २० एप्रिल रोजी झालेल्या उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही खूशखबर राज्याच्या जनतेला दिली.
प्यारे प्रदेशवासियों,
आज मंत्रिपरिषद की बैठक में यह निर्णय लिया गया है कि उत्तर प्रदेश में 18 वर्ष से अधिक आयु के सभी प्रदेशवासियों का कोरोना टीकाकरण @UPGovt द्वारा निःशुल्क कराया जाएगा।
कोरोना हारेगा, भारत जीतेगा…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 20, 2021
राज्यातील जनतेला निःशुल्क लस देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशमधील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. या आधी बिहार राज्यात नागरिकांना मोफत लस दिली जात होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणूकीत मोफत लसीकरणाचे वचन दिले होते, त्याचे पालन केले.