ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?

ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?

राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आले तर ते सुखरूप परत येऊ शकणार नाहीत, असे आव्हान भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याला ब्रिजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातही वातावरण तापले होते. पुण्यामध्ये २० ते २५ डिसेम्बर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे आता मनसे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात अशी चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर्षी मी महिन्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशचे सिंह यांनी राज ठाकरेंना उघडपणे विरोध केला होता. सिंह यांनी याआधीच्या काळात मनसेने उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि अयोध्येला जाण्यापूर्वी राज ठाकरे यांची माफी मागण्याची अट देखील ठेवली होती.

राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आले तर ते सुखरूप परत येऊ शकणार नाहीत, असे आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी दिले होते. मनसे आणि भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशात ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना आव्हान दिल्याची जोरदार चर्चा रंगली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्या वारंवार आव्हानानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला. त्यामुळे अशा स्थितीत मनसेची प्रतिक्रिया पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

ब्रिजभूषण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील गोंड येथे राहणारे आहेत. ते उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील भाजपचे खासदार आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अयोध्येतील कुस्तीच्या आखाड्यात बराच काळ घालवला आहे.पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत. मनसे -सिह यांच्यातील कुस्ती कोणत्या आखाड्यात लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Exit mobile version