उत्पल पर्रीकरांचे ठरले…पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार

उत्पल पर्रीकरांचे ठरले…पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार

गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांच्या चिरंजीवांनी अखेर आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे. उत्पल पर्रीकर पणजी मतदार संघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पणजी मतदार संघातून आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शुक्रवार, २१ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत उत्पल पर्रीकर यांनी ही घोषणा केली आहे.

गोव्यातील भाजपाचे लोकप्रिय नेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास पहिल्यापासूनच इच्छुक होते. भारतीय जनता पार्टीने आपल्याला पणजी मतदारसंघातून तिकीट द्यावे अशी त्यांची इच्छा होती पण भाजपाने गोवा विधानसभेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पणजीतील उमेदवार म्हणून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली. यावेळी उत्पल पर्रीकर यांना इतर दोन मतदारसंघांचे पर्याय देण्यात आल्याचे भाजपाकडून सांगितले. पण हे दोन्ही पर्याय उत्पल पर्रीकरांना मान्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पण त्यांच्याशी याबाबत चर्चा अजूनही सुरू असल्याचाही खुलासा भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

हे ही वाचा:

इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?

पण उत्पल पर्रीकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाने आपल्या समोर ठेवलेले बदल आपल्याला मान्य नसल्याचे जाहीर करताना, पणजी मतदारसंघातून आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे सांगितले. पण यावेळी मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असल्याचेही उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे.

तर मला कोणतेही राजकीय महत्त्वाकांक्षा नसून मी माझ्या वडिलांच्या राजकीय मूल्यांसाठी लढा देत आहे असे उत्पल पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. गोवा विधानसभा निवडणूक पणजी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक खूपच रंगतदार होणार असे मत जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत.

Exit mobile version