उत्पल पर्रीकर पराभूत

उत्पल पर्रीकर पराभूत

गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टी बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. तर काँग्रेसचा पराभव होताना दिसत आहे. पण या सगळ्या धुमाकुळीत उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे.

उत्पल हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव. उत्पल हे विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक होते. पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रीकर यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण भाजपाने त्यांना दुसऱ्या मतदारसंघांचे पर्याय समोर ठेवले होते. पण उत्पल यांना ते मान्य नव्हते.

हे ही वाचा:

काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास

आसाम नगरपालिकेमध्ये भाजपाचा मोठा विजय

भाजपा सपा मध्ये लागली ही अनोखी पैज

पाच राज्यात मतमोजणी सुरु! चार राज्यात भाजपा, पंजाबमध्ये आप

परिणामी त्यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपाने या मतदारसंघातून बाबूश मॉन्सेरात यांना तिकीट दिले होते. उत्पल पर्रीकर यांना अशाप्रकारे निवडणूक लढायला लागणे कोणालाच पसंत पडले नव्हते. भाजपानेही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही उत्पल हे निवडणूक लढण्यावर ठाम होते.

पण अखेर आज निकालानंतर उत्पल यांचा पराभव झाल्याचे समोर आले. या संपूर्ण निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हि एक चांगली लढत झाल्याचे म्हटले आहे. तर त्यांनी पूर्ण ताकदीनिशी लढत दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version