अमेरिकेत लवकरच निवडणुका लागणार असून निवडणुकीच्या तोंडावर आता देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपलं नाव मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. बायडन यांच्यानंतर आता कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढील दावेदार असतील.
गेल्या काही दिवसांपासून जो बायडेन यांची प्रकृती आणि बोलण्यातील चुका पाहून लोक त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. अमेरिकेत निवडणुकीदरम्यान महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या डिबेटमध्ये देखील जो बायडेन हे प्रतिस्पर्धी असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून पिछाडीवर पडत चालले होते. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. जो बायडेन यांनी पत्र लिहून याची घोषणा केली आहे.
My fellow Democrats, I have decided not to accept the nomination and to focus all my energies on my duties as President for the remainder of my term. My very first decision as the party nominee in 2020 was to pick Kamala Harris as my Vice President. And it’s been the best… pic.twitter.com/x8DnvuImJV
— Joe Biden (@JoeBiden) July 21, 2024
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लाईव्ह डिबेटचा एक महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये ते ट्रम्प यांच्याविरोधात अनेकदा चर्चा करतेवेळी अचानक थांबले होते. अशावेळी बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाजुला करावे अशी मागणी होत होती. अखेर रविवारी बायडेन यांनी पक्षाच्या आणि देशाच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी बायडेन यांनी कमला हॅरीस यांना समर्थन दिले आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !
इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !
एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…
फ्लाईटमध्ये विनयभंग; जिंदाल स्टीलच्या सीईओला गमवावी लागली नोकरी !
“आज मी कमला यांना या वर्षी आमच्या पक्षाचे उमेदवार होण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन देऊ इच्छितो. डेमोक्रॅट – एकत्र येण्याची आणि ट्रम्पला पराभूत करण्याची वेळ आली आहे. चला हे करूया,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, जर बायडन यांचे समर्थन मान्य झाले तर कमला हॅरिस या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला असणार आहेत.