अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाकडून दोन दिवसांपूर्वी एक अहवाल अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आला. या अहवालामध्ये अमेरिकेने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव नमूद करत त्यांचे कौतुक केले आहे. भारताने महामारीच्या तिन्ही लाटांचा सामना केला असतानासुद्धा आर्थिक आघाडीवर भारताने दमदार कामगिरी केली असल्याचे त्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात भारताची अर्थव्यवस्था कोरोना महामारीनंतर कशी सावरली याचे कौतुक केले आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी वर्ष २०२१ च्या मध्यापर्यंत अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला होता. या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली होती. मात्र कोरोना लाट ओसरताच भारताने काही महिन्यातच आपली अर्थव्यवस्था व्यवस्थित केली आहे. या अहवालात भारताच्या लसीकरण मोहिमेचे देखील कौतुक करण्यात आले आहे.
भारताने युद्धपातळीवर लसीकरण राबवले होते. २०२१ च्या शेवटी भारतात जवळपास ४४ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले होते. कोरोनापूर्व काळात भारताचा आर्थिक विकास दर जवळपास आठ टक्क्यांच्या आसपास होता. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाटेचा आर्थिक विकास दराला मोठा फटका बसला. लॉकडाऊन काळात सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प होते. तसेच बेरोजगारीमध्ये देखील वाढ झाली होती. परंतु २०२१ च्या शेवटी कोरोना लाटेचा प्रभाव कमी होताच भारताने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना दिली. त्याचा परिणाम म्हणजे आज भारताची अर्थव्यवस्था कोरोनापूर्व काळात ज्या टप्प्यावर होती तिथे जवळपास पोहोचल्याचे देखील या अहवालामध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”
रतन टाटा मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने सन्मानित
पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’
तसेच २०२१ च्या शेवटी आलेल्या ओमायक्रोनच्या लाटेत भारतातील मृत्यूदर अत्यंत कमी होता अस देखील ह्या अहवालात म्हटले आहे. लॉकडाऊन काळात भारत सरकारकडून अनेक योजना राबवण्यात आल्या. त्याचा मोठा फायदा हा तेथील जनतेला झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोना काळात आपला रेपो रेट स्थिर ठेवला होता. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.