28 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरराजकारणफडणवीस म्हणाले, शहरी नक्षलवाद्यांची विद्यापीठांमध्ये घुसखोरी

फडणवीस म्हणाले, शहरी नक्षलवाद्यांची विद्यापीठांमध्ये घुसखोरी

आजच्या तरुणांनी राष्ट्रवाद आपल्यात रुजवला नाही तर आपण हे प्रॉक्सी युद्ध लढू शकणार नाही.

Google News Follow

Related

‘शहरी नक्षलवादी हे युवकांचे ब्रेनवॉश करण्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘राष्ट्रवादावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन या शहरी नक्षलवाद्यांना रोखण्याचे आवाहन करतो. हे नक्षलवादी भारताविरुद्ध (छद्म युद्ध) प्रॉक्सी वॉर छेडत आहेत. भारत इतका शक्तिशाली झाला आहे की, आपले शेजारी आपल्याला आव्हान देण्यापूर्वी दोनदा विचार करतात. त्यामुळे आता प्रॉक्सी वॉर लढले जात आहे. हे युद्ध केवळ सीमेपलीकडील दहशतवादीच करत नाहीत, तर आपल्याच देशातील शहरी नक्षलवाद्यांसारखे काही लोकही त्यात सामील आहेत,’ असे ते म्हणाले.

अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा एक भाग म्हणून आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस शुक्रवारी शहरात आले होते. त्यांच्यासोबत माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज नरवणे, भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी आणि अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.

“सरकारच्या जोरदार कारवाईनंतर हातात बंदुका असलेल्या माओवाद्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. पण आता तरुणांचे ब्रेनवॉश करण्यासाठी ते हळूहळू आमच्या कॅम्पस आणि विद्यापीठांना लक्ष्य करत आहेत. त्यांना समाजात फूट निर्माण करायची आहे, ज्यामुळे अराजकता निर्माण होईल,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी तरुण पिढीला राष्ट्रविरोधी विचारसरणीशी लढण्याचे आवाहन केले. “जर आजच्या तरुणांनी राष्ट्रवाद आपल्यात रुजवला नाही तर आपण हे प्रॉक्सी युद्ध लढू शकणार नाही. आपल्या विद्यापीठांमध्ये शहरी नक्षलवाद्यांचा प्रसार रोखण्यासाठी तरुण पिढीने पुढे आले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

एनआयएने केली यासिन मलिकच्या फाशीची मागणी

गुजरातला शुभमन शकून! तिसरे शतक, ८५१ धावा

संजय राऊत यांनी कबूल केले आम्ही थकलो!

संसद भवनविरोधींची कृती बालिशपणाची!

‘भारताला विकसित होण्यासाठी विविधतेचे शक्तीमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे. विविधतेत एकता असणारे आपले राष्ट्र आहे, असे आपण अनेकदा म्हणतो, परंतु जेव्हा आपण त्या विविधतेचे आपल्या ताकदीत रूपांतर करतो तेव्हाच आपण विकसित राष्ट्र बनू. आजच्या तरुणांचा राष्ट्र उभारणीत मोठा वाटा आहे. आपली राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी तो राष्ट्रवाद तरुण पिढीमध्ये रुजवणे आवश्यक आहे,’ असे अभाविपच्या सदस्यांना संबोधित करताना माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) नरवणे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा