26 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरराजकारण“व्याज दर कमी ठेवून आर्थिक प्रगती होत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी युपीएचा...

“व्याज दर कमी ठेवून आर्थिक प्रगती होत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी युपीएचा आरबीआयवर दबाव”

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा पुस्तकातून खळबळजनक खुलासा

Google News Follow

Related

आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या पुस्तकात तत्कालीन युपीए सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. युपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना अर्थ मंत्रालयाकडून रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, असा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

आरबीआयच्या स्वायतत्तेबद्दल तत्कालीन केंद्र सरकारला काहीही देणघेण नव्हते

डी सुब्बाराव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात म्हटले आहे की, देशाच्या मध्यवर्ती बँकेची स्वायत्तता राखण्याचे आकलन आणि समज तेव्हाच्या सरकारमध्ये नव्हती. सरकार आणि आरबीआय बँक या दोन्ही ठिकाणचा अनुभव असल्यामुळे अधिकाराने सांगता येऊ शकते की, आरबीआयच्या स्वायतत्तेबद्दल केंद्र सरकारला काहीही देणघेण नव्हते. तसेच व्याज दर कमी ठेवून युपीएच्या काळात खूप आर्थिक प्रगती होत आहे, असे चित्र निर्माण करण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक दावाही डी सुब्बाराव यांनी केला आहे.

सप्टेंबर २००८ मध्ये लेहमन ब्रदर्सचे संकट येण्यापूर्वीम्हणजेच २००७ ते २००८ या काळात सुब्बाराव हे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी वित्त सचिव होते. त्यानंतर ५ सप्टेंबर २००८ पासून त्यांनी पुढे पाच वर्ष आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम केले. विशेष म्हणजे १६ सप्टेंबर रोजी अमेरिकेत लेहमन ब्रदर्स आर्थिक संकट कोसळले होते. त्याच्या काही दिवस आधीच त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता.

आरबीआयच्या आर्थिक अंदाजाचा विरोध करून त्यांचे आकडे थोपण्याचा प्रयत्न

प्रवण मुखर्जी अर्थमंत्री असतानाचा एक प्रसंग त्यांनी पुस्तकात लिहिला आहे. ते म्हणाले, वित्त सचिव अरविंद मायाराम आणि मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी आमच्या आर्थिक अंदाजाचा विरोध करून त्यांचे आकडे आमच्यावर थोपण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय मायाराम एका बैठकीत म्हणाले होते की, जगात सगळीकडे सरकार आणि केंद्रीय मध्यवर्ती बँक एकमेकांना सहकार्य करतात. मात्र, भारतातच रिझर्व्ह बँक काही करत नाही.

हे ही वाचा:

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

रिझर्व्ह बँकेच्या धोरणांबद्दल चिदंबरम आणि मुखर्जी या दोघांशीही आपला संघर्ष होत असल्याचे सुब्बाराव यांनी म्हटले आहे. दोघांची काम करण्याची शैली वेगवेगळी होती. चिदंबरम हे व्यावसायिक वकिलाप्रमाणे त्यांची बाजू मांडत वाद घालायचे. तर मुखर्जी हे नम्रतापूर्वक आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न करत असत. यानंतर वाद घालण्याचे काम आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवत असत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा