31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणलोकशाहीच्या महयज्ञात द्या मतदानाची आहुती!

लोकशाहीच्या महयज्ञात द्या मतदानाची आहुती!

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना दिसत आहेत. पण अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदारांना आपल्या अनोख्या शैलीत हटके असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या धार्मिक व्यक्तिमत्वानुसार तसेच उदाहरण देत राज्यातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगितले आहे.

लोकशाहीच्या महायज्ञाचा पहिला टप्पा आज पार पडत आहे. तुमच्या अमूल्य मताच्या आहुती शिवाय हे अनुष्ठान पूर्ण होणार नाही असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर लिहिले आहे. तर तुमचे एक मत गुन्हेगारीमुक्त, भयमुक्त, दंगामुक्त उत्तर प्रदेशच्या संकल्पाला आणखीन मजबूत करेल. तेव्हा पहिले मतदान करा आणि नंतरच जलपान करा आणि नंतर इतर कामे करा असे योगी आदित्यनाथ यांनी दिले.

हे ही वाचा:

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स

विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर

‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’

तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीही उत्तर प्रदेशच्या जनतेला आपला मताधिकार बजावण्यासाठी आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशच्या महान जनतेने उत्तम प्रदेश बनताना पाहिले आहे. प्रशासन व्यवस्थेला दुरुस्त करणारे हे सुशासन देणारे सरकार आहे. तुमच्या राज्याची प्रगती, समृद्धी आणि खुशाली टिकवून ठेवण्याची ही सुवर्णसंधी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा मताधिकार जरूर वापरावा असे नड्डा यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा