31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणआज उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा! ५८ जागांवर ६२३ उमेदवार रिंगणात

आज उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा! ५८ जागांवर ६२३ उमेदवार रिंगणात

Google News Follow

Related

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. ज्यामध्ये ११ जिल्ह्यांतील एकूण ५८ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांग लावून नागरिक आपला मतदानाचा अधिकार बजावताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेश मधील पश्चिमेकडच्या या ५८ जागा आहेत. या प्रदेशाचा विचार करता तिथे एकेकाळी बहुजन समाज पक्षाचा दबदबा होता. पण गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा हा गड बनला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या ५८ जागांपैकी ५३ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. तर २ जागांवर समाजवादी पक्ष आणि २ जागांवर बहुजन समाज पक्ष विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचाही विचार केला तर या भागात भाजपाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ५८ विधानसभा क्षेत्रापैकी तब्बल ४६ विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाला आघाडी मिळाली होती. त्यामुळे निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रकारे आघाडी घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

हे ही वाचा:

विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर

‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’

कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड

सचिन वाझे म्हणतो, मला अनिल देशमुखांनीच वसुलीचे आदेश दिले!

५८ जागांपैकी ९ जागा या एससी, एसटी उमेदवारांसाठी राखीव असणार आहेत. तरी या ५८ जागांवर एकूण ६२३ उमेदवार आपले नशीब आजमावत असून यापैकी ७४ महिला उमेदवार आहेत. तर या सर्व उमेदवारांचे भवितव्य हे २ कोटी २७ लाख मतदारांच्या हातात असणार आहे. त्यामुळे आजचा हा निवडणुकीचा टप्पा हा फारच महत्वाचा आहे. तर यानंतर आणखीन ६ टप्पे पार पडणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा