उत्तर प्रदेशचे मंत्री विजय कश्यप यांचे निधन

उत्तर प्रदेशचे मंत्री विजय कश्यप यांचे निधन

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री विजय कश्‍यप यांचे मंगळवार, १८ मे रोजी निधन झाले. कश्‍यप यांना कोरोनाने ग्रासले होते. गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले.

देशभर सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून त्यात दर दिवशी हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री विजय कश्यप यांचेही कोरोनामुळे निधन झाले. उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते महसूल आणि पूर नियंत्रण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम बघत होते. मुजफ्फरनगरमधील चरथावल विधानसभा क्षेत्रातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. कश्यप हे कोरोनाच्या कचाट्यात सापडले असून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. वयाच्या ५२ व्या वर्षी कश्यप यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. विजय कश्यप हे उत्तर प्रदेश मधील पाचवे आमदार आहेत ज्यांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले.

हे ही वाचा:

आठवड्याला ५५ तासांपेक्षा अधिक काम ठरते मृत्युचे कारण

काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगा आणि मिळवा १ लाख

कश्यप यांच्या जाण्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. कश्यप हे एक जमिनीवरचे नेता असून सदैव जनहिताच्या कामांसाठी ते समर्पित होते, असे मोदी यांनी म्हटले आहे.

तर कश्यप यांच्या आत्म्याला प्रभू श्रीरामांनी परमधामात स्थान द्यावे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Exit mobile version