महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या कहराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात देखील रविवारी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. त्याबरोबरच प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर ₹१,००० दंड आकारण्याबाबत कोणताही निर्णय अद्यापि घेतलेला नाही. दंडाची रक्कम दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास दहापट करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेसचा नेता असणे पुरेसे असते
पीएम केअरचा हिशोब मागणाऱ्यांना पंतप्रधानांचे कृतीतून उत्तर
ससून रुग्णालयातील डॉक्टर संपावर, या आहेत पाच मागण्या
पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे- सरन्यायाधीश शरद बोबडे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे बाधित राज्य आहे. या राज्यात सध्या १ लाख २९ हजार ८४८ बाधित रुग्ण आहेत. रुग्णवाढ वेगाने होत असल्याने आता हळूहळू उत्तर प्रदेशातही रुग्णांना बेड्स मिळणे अवघड होऊ लागले आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशात अनेक आठवडे कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर ते हळूहळू शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर केवळ रविवारसाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी कंटेन्मेन्ट झोन निर्माण करण्यात आले आहेत. विविध राज्यातून परतणाऱ्या मजूरांना विलगीकरण करण्याचे आदेश देखील शासनातर्फे देण्यात आले आहेत. वाराणसी प्रशासनाने शहरातील मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे.
त्याशिवाय शालांत परिक्षा पुढे २० मे पर्यंत ढकलण्यात आल्या आहेत तर विद्यापीठांच्या परिक्षा देखील १५ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.