लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांनी, उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करून एक सामंजस्याचा मार्ग काढला आहे. यामुळे आंदोलकांनी आज पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला. काल एक गाडी आंदोलकांवर घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यात ४ शेतकरी आंदोलन मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. या गाडीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा असल्याचाही आरोप केला जात आहे.

काल लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि इतर अनेक जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात इतर चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने ४५ लाखांची भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. जखमींना ₹१० लाखांची भरपाई मिळेल.

अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आरोप केला होता की, ते स्वतः वाहन चालवत होते आणि मंत्र्यांच्या भेटीला विरोध करणाऱ्यां आंदोलकांना त्यांनी मारले.

आज पोलिसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारींच्या आधारे तपास केला जाईल. गृह राज्यमंत्री मिश्रा यांनी त्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित असल्याच्या आरोपांना बिनबुडाचे म्हणून संबोधले आहे. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांवर आंदोलकांनी लाठ्या -तलवारीने हल्ला करण्यात आला. सदर गाडी उलटल्यावर त्या खाली येऊन काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

काय आहे नार्कोटिक जिहाद?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

अमेरिकेतील मृतांचा आकडा पोहोचला सात लाखांवर

ते म्हणाले, “माझा मुलगा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित होता. मी उपमुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करत होतो.” आंदोलक केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा दौरा रोखण्याचा प्रयत्न करत होते. मिश्रा यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमात हे दोघे उपस्थित राहणार होते.

Exit mobile version