धर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये

धर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये

धर्मांतरण करणाऱ्या मौलाना कलीम याला काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) अटक केल्यानंतर आता त्याचे दोन सहकारीही उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात आले आहेत. नाशिकमध्ये हिंदू नाव धारण करून राहाणाऱ्या एकाच्या मुसक्याही उत्तर प्रदेश एटीएसने आवळल्या आहेत. महाराष्ट्राच्या एटीएसला याचा पत्ता का लागू नये, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

अतिफ उर्फ कुणाल चौधरी या इसमाला नाशिकच्या आनंद नगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. हा कलीमचा गेली दोन वर्षे सहकारी म्हणून काम करत होता. धर्मांतरण करण्यासाठी परदेशातून प्रचंड पैसा मिळत असल्याचे कलीमने पोलिसांना जबाबात सांगितले आहे. ज्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे त्यातील एक मोहम्मद इद्रिस कुरेशी आहे तर दुसरा मुझफ्फरनगरचा मोहम्मद सलीम आहे.

२२ सप्टेंबर रोजी कलीमला पोलिसांनी अटक केली होती. ६४ वर्षीय कलीम याचे नाव उमर गौतम प्रकरणात उघड झाले होते. त्यावरून कलीमला मीरतमधून अटक करण्यात आली आणि आता उत्तर प्रदेश पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, कलीम सिद्दीकी हा जामिया इमाम वलिउल्ला ट्रस्ट चालवत असून त्याला परदेशातून जो निधी मिळत होता तो मदरशांसाठी वापरत होता. त्याला एकूण ३ कोटी रुपये या निधीपोटी मिळाले. त्याती १.५ कोटी हे बहारिनमधून प्राप्त झाले.

महाराष्ट्राच्या एटीएसला या खबर का नाही?

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, धर्मांतराचं रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली नाशिकमधून उत्तर प्रदेश एटीएसने कुणाल म्हणून वास्तव्यास असलेल्या आतिफला बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्राच्या एटीएसला याचा सुगावाही लागू नये हे आश्चर्यजनक आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला गृहमंत्र्यांनी वेगळे काही काम दिलेले आहे का?

Exit mobile version