राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन

राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन

राज्यसभेत काल जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यानंतर सभागृह आहे की कुस्तीचा आखाडा असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. सभागृहात खासदारांऐवजी मार्शल्सची संख्या जास्त दिसत होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या गोंधळावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या विषयावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

“राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन. अगदी राहुल गांधी यांच्या प्रगल्भ नेतृत्वासारखे.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही काल १२७ व्या घटनादुरुस्तीवर चर्चा झाली आणि विधेयक  देखील मंजूर झालं. चार आठवड्यांमध्ये हे एकमेव विधेयक होतं, ज्यासाठी विरोधक सहकार्य करायला तयार झाले होते. काल संध्याकाळी सहापर्यंत त्यामुळे सभागृह  ठीक चाललं होतं.पण हे विधेयक संपल्यानंतर सरकारनं विमा संशोधन विधेयकही मांडायला घेतलं आणि गदारोळ सुरु झाला.

दरम्यान, आज दीड डझन विरोधी पक्षाने संसदेपासून विजय चौकापर्यंत पायी मार्च काढला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर, विरोधक वारंवार सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.

हे ही वाचा:

सरकार आहे की सर्कस?

मुंबईत दंड वसुलीसाठी आता ‘ही’ नवी मोहीम

ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

संसदेचं अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या काळापर्यंत प्रस्तावित होतं.पण सरकारनं ते दोन दिवस आधीच गुंडाळलं. त्यातही अशा अभूतपूर्व गोंधळातच या अधिवेशनाचा समारोप झालाय. जे झालं त्याला नेमकं जबाबदार कोण, त्यांच्यावर काही कारवाई होणार का याचं उत्तर तर मिळेलच पण यात देशाच्या संसदीय परंपरेला मात्र काळिमा फासला गेला आहे.

Exit mobile version