भास्कर जाधवांच्या घरावर दगड, स्टम्प, बाटल्या फेकल्या

हल्लेखोर कोण आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू

भास्कर जाधवांच्या घरावर दगड, स्टम्प, बाटल्या फेकल्या

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. कोकणात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार भास्कर जाधव आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोर कोण आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर काल रात्री अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री जाधव यांच्या घरावर दगड, स्टम्प आणि बाटल्या फेकून घटनास्थळावरून पसार झाले आहेत. ही दगडफेक कोणी केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे. तसेच घराशेजारील सीसीटीव्ही कॅमरे तपासले जात आहेत.

हे ही वाचा:

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची गोड बातमी

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेचा लाभ

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. यावेळी भास्कर जाधव हे सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान या हल्ल्यासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी ‘टीव्ही ९’ ला प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव हे तोंड सुटल्यासारखे बोलत आहेत. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना मानणारे लोक आहेत. त्यांचे कार्यकर्ते आहेत. या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर बोललं तर त्यांचे कार्यकर्ते किती दिवस सहन करणार. भास्कर जाधव जसं बोलणार तर त्यांनी तसं सहन करायची तयारी ठेवायला हवी. कायदा सुव्यवस्था बिघडवायची आमची इच्छा नाही पण आम्ही कार्यकर्त्यांना किती सांगणार संयम ठेवा. पण जाधव यांच्या घरावर हल्ला कोणी केला हे पोलिसांनी शोधायला हवं. आमदार वैभव नाईक यांच्याविषयी त्यांनी बोलायला हवं. आमच्यावर टीका करणार तर त्यांच्या आरेला कारे करणारचं ना, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Exit mobile version