राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

देश चालवण्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यात संवाद आवश्यक आहे. भारत हे साम्राज्य नाही आणि राज्यांना दडपले जाऊ शकत नाही. असे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मात्र यावरून केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना पेगासस, चीन, बेरोजगारी अशा मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केल्याने दिल्लीतील वातावरण तापले आहे. केंद्रातील मंत्र्यांनी लगेचच राहुल यांच्यावर पलटवार केला असून, लोकशाहीतील महत्त्वाच्या संस्थांवर बेताल आरोप करणाऱ्या राहुल यांनी या संस्थांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीच मंत्र्यांनी केली आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल यांच्या चीनबाबतच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘ चीनची समस्या ज्यांच्यामुळे निर्माण झाली, ज्यांनी चीनशी आर्थिक फायद्याचे व्यवहार केले, तेच आज चीनपासून धोका असल्याचे सांगत आहेत. विचारांचा गोंधळ झाला की अशीच अवस्था होते, असा पलटवार जोशी यांनी केला आहे. आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडण्याची कृती करणाऱ्या राहुल यांनी मोदी सरकारला सल्ले देऊ नयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता त्यांना खुपत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आम्ही इतकंच सांगू शकतो की, पाकिस्तान, चीन वा अन्य कोणाचेही आव्हान परतवून लावण्यास मोदी सरकार सक्षम आहे, असे जोशी म्हणाले.

हे ही वाचा:

नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच! तारखाही ठरल्या

U19 WC: भारताचे निर्विवाद ‘यश’! ऑस्ट्रेलियाला ‘धुल’ चारत अंतिम फेरीत धडक

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी

न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि पेगासस स्पायवेअर अशा माध्यमांतून मोदी सरकार लोकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, असा आरोप राहुल यांनी लोकसभेत केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. न्यायपालिका आणि निवडणूक आयोग ही भारतीय लोकशाहीची महत्त्वाचे भाग आहेत. त्यावर अशाप्रकारची टीका आजवर कुणीही केलेली नाही. राहुल यांनी मर्यादा ओलांडल्या असून, यासाठी त्यांनी तत्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणी रिजिजू यांनी केली आहे.

Exit mobile version