30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी ठरले 'कार्यक्षम खासदार'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ठरले ‘कार्यक्षम खासदार’

Google News Follow

Related

नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा २०२०-२१ चा ‘कार्यक्षम खासदार ‘ पुरस्कार केंद्रीय वाहतूक व बाधकाम मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. १० फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता नवी दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पन्नास हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. डॉ. सुभाष भामरे, खा.हेमंत गोडसे, खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच कार्यक्रम ऑनलाईन सार्वजनिक वाचनालयाच्या फेसबुक पेज वरून प्रसारित करण्यात येणार आहे.

यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदार यांना दिला जात होता. यावर्षीपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षा आड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.

माधवराव लिमये यांच्या नावाने का देतात पुरस्कार?

दिवंगत माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. स्व. लिमये हे पत्रकार, लेखक व सामाजिक, शेक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांचा सार्वजनिक वाचानाल्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ.शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून सदरचा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?

९.४५ कोटींची संपत्ती असणारे चन्नी गरीब?

महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन

स्व.माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय, नाशिक दरवर्षी विधान परिषद, विधान सभा, लोक सभा, राज्य सभा ह्या पैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी निवड करीत असते. पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा