मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले

गृहमंत्री अमित शाह यांचा उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले

महाराष्ट्रात सत्यमेव जयतेचा फॉर्म्युला स्थापन झाला आहे. मोदींचा फोटो लावून मते मागितली. मात्र, निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी जोरदार टीका जोरदार टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. शुक्रवारी दूध का दूध आणि पानी का पानी झाले . सत्यमेव जयतेचे सूत्र साकार झाले आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत भारतातील निवडून आलेल्या सरकारांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तो सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. यूपीएच्या काळात प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांनाही पंतप्रधान मानत नव्हता. यूपीएच्या कार्यकाळात १२ लाख कोटींचे घोटाळे झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा धुळीस मिसळली, असा आरोप गृहमंत्री शहा यांनी केला.

हे ही वाचा:

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ वाया गेला असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगावला फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षे वाया गेली. आता आमच्याकडे अडीच वर्षे शिल्लक आहेत, आमच्याकडे खूप काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे ‘डबल हॉर्सपॉवर’ सरकार पूर्ण ताकदीने काम करेल.

काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींनी काश्मीरमध्ये जाऊन तिरंगा फडकवला. काँग्रेसच्या राजवटीत ते हे करू शकले नाहीत कारण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी कलम ३७० रद्द केल्यावरच ते शक्य झाले.

Exit mobile version